खरं तर या विषयाला 'आजची पत्रकारिता' किंवा 'पत्रकारिता: काल, आज, उद्या' टायपातलं नाव सारखं सुचत होतं, पण अशा नावाखाली जनरली 'आज भारत देश एका नव्या वळणावर येऊन थांबला आहे, अशा वेळी..' वगैरे सुरूवात होते.. असो.
काल म्हणजे ८ एप्रिल, २०१०ला दैनिक सकाळ मधील कोण्या एका काव्यप्रेमी पत्रकाराची बातमी वाचली.. आयपीएलमधील 'कोलकाता नाईट रायडर्सच्या विजया'ची बातमी एकदम मस्त आली आहे.. '' दादाचा फ़िल्डिंगशी वादा ! ईडन गार्डनवर नाईट रायडर जिंकल्याने शाहरुख फ़िदा ! आयपीएल आव्हानाला गती ''
बहुधा हे हेडिंग सुचवणारा नवकवी असावा.. यमक वगैरे तत्सम गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं असावं.. त्याच्याच शेजारच्या पानावरची आयपीएलचीच अजून एक बातमी -- 'लंबची लांब लांब टोलेबाजी !'
हे वाचून मी २२ विकेटने हारलो.. बातमीमध्ये तर अफ़ाट मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.. उदाहरणार्थ, ... गंभीर धावचीत झाला आणि मैदानावरील इतर दहा क्षेत्ररक्षक 'दादा'ला मिठी मारण्यासाठी धावले
... तरीही कोलकात्यासमोर 'विरू'चा अडथळा होता. 'विरू' गेल्याशिवाय 'जय' कसा मिळणार ( या कोटीनंतर मी भावनिक झालो )
हे सगळं इथे बोलण्यामागे उदात्त वगैरे काहीच हेतु नाही...फक्त आपल्या काव्यप्रतिभेला अशा ठिकाणी वाट मोकळी करून दिली की सगळा फ़िल निघून जातो बातमीतला, असं आपलं माझं एक मत... इतर पोश्टांमधून गंभीर विषयांवर बोलतच आहोत आपण, सो इथे जरा वेग़ळं..
असो. 'दादा-वादा'वालं हेडिंग वाचून मलाही शीघ्र कविता आली..
'दादा'चा 'फिल्डिंग'शी वादा !
इडन गार्डनवर नाइट रायडर्स जिंकल्याने शाहरुख 'फ़िदा' !
मैदानात घेऊन फ़िरला तो 'गदा' !
उड्या मारतो 'सदान्कदा' !
महाग झाला आता मैदा !
श्रीशांतच्या निराळ्याच अदा !
जाऊ दे, आता पोश्ट झाली जादा !
'दादा'चा 'फिल्डिंग'शी 'वादा', 'दादा'चा 'फिल्डिंग'शी 'वादा' !!
- ...गौरव दिवेकर...
Thursday, April 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
There you hit the crux of the matter,Gaurav.It is wether journalism informs or itis mere a commodity to entertain?
ReplyDeleteAre "nava kavi" asna ani tyawar pot chalavna sopa nahiye! Paper wale ashya lokana kam detayt re! Changli baju bagh na!! Ashya lokanchya sampoorna kavita aiknyapeksha thodkyat godi hotay he changlay na!! :P
ReplyDeletejamana badalalay tas IPL kade lok manoranjanacha bhag mhanunach pahtat.Shighrakavi hedekhil tyach pathaditale tyamule tyat vavag asa kahi nahi tu dekhil shevti ek shighr kavich zala na?
ReplyDeleteअस नका म्हणू मित्रांनो ..... माझ्यासार्ख्यांचे काय होईल याचा तरी विचार करा ?
ReplyDeleteपण, तसे पाहता , सकाळ सारख्या अत्यंत रटाळ पेपरमध्ये कोणी कविता रचल्या तर निदान ती रद्दी काही प्रमाणात तरी वाचनीय होईल!
@ Aseim: :P
ReplyDeleteअहो सर, खुशाल छापू दे त्यांना कविता पेपरमध्ये.. पण, हेडिंगचा आनी बातमीचा काहीतरी संबंध असायला हवा ना.. उगीच सुचलं म्हणून काहीपण हेडिंग द्याय्चं का?
ReplyDeleteआता 'दादा'चा 'फिल्डींग'शी 'वादा' या मथळ्यावरून काय कळतं? 'वादा' म्हणजे काय म्हणायचंय त्या काकांना? दोन बॉल डाईव्ह टाकून अडवले म्हणजे लगेच 'फ़िल्डिंग'शी वादा झाला? आणि मुख्य म्हणजे, 'वादा' झाला म्हणजे झालं काय? जर गांगुलीचा फिल्डिंगेशी वादा असेल, तर जॉन्टी र्होड्स, महंमद कैफ़, रॉबिन सिंग, विराट कोहली आणि इतरांचं काय नातं असेल फ़िल्डिंगशी?
असो.
दुसरी बातमी -
लंबची लांब लांब टोलेबाजी
उगीच रिदमिक वाटतं म्हणून दिलंय का हे? कोण लंब ? लांब लांब टोलेबाजी म्हणजे काय? ग्राऊंडच्या बाहेर मारले का सगळे बॉल ? याची लांब लांब टोलेबाजी, मग रॉबिन उथप्पा, ख्रिस गेल, ब्रॅडन मॅकल्लम, युसुफ़ पठाण यांची फ़लंदाजी कशी असते?
उगीच निरर्थक मथळा का द्यावा आणि त्यातही यमक न जुळणारी कविता का करावी?
'विरु' असताना 'जय' कसा मिळणार - हे वाक्य ज्या क्षणी सुचलें, त्या क्षणाला मी
साष्टांग नमस्कार घालू इच्छितो...
Hi , this is reshma here.
ReplyDeleteKawita mhanje yamak nahi he swatala kawi mhananaryana pahile samjle pahije. ha wangmayacha (literaturecha ho. wachkano samjun ghya)tas naslyane tyawar charcha karat nahi. Pan mathala ani batmi yat kahitari(!!!) sadharmya asawelch. Nahitar naw sonubai ani hati kathlyacha wala. Jara jastch 'chu'ddha Marathi hot aahe pan wachak sujan aahe. WACHAKANNI SAMJUN GHYAWE.
MALA, MAJYA PATRAKARITELA
ANI NAWKAWILA
MATHALE, TYANCHYANTLA BATMILA
SHEWTI KAY ?
YAMAK JULATO JYALA
SAMIKSHAK(?) KAWI KARTI TYALA.
फक्त एकच सुधारणा- दादाने केला फिल्डिंगचा वांदा- असं बातमी लिहिणाऱ्याला म्हणायचं असावं.
ReplyDeleteया पोष्टेमुळे दोन - क्रीडा समीक्षक नवकवी पत्रकार - पुण्याला मिळाले. भेटा जरा सकाळी (म्हणजे सकाळ येथे) सक्काळी...