Monday, July 26, 2010

कारगिल विजय दिवसाचं विस्मरण

गौरव दिवेकर:-
भारतामध्ये राष्ट्रप्रेम हे दोनच घटनांमध्ये उफ़ाळून येतं म्हणतात. एक भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच असेल तर किंवा युद्धाच्या वेळी. (हल्ली प्रादेशिकवादाच्या मुद्द्यामध्येही 'राष्ट्रप्रेमाचे' दाखले दिले जातात, ते वेगळे) इतर वेळी मात्र कुठलं राष्ट्रं आणि कसलं काय. बाकीच्यांचं सोडून द्या. आपण माध्यमांमधले लोक 'समाजाला दिशा देणारे' वगैरे म्हणवून घेतो स्वत:ला आणि आपण तरी काय वेगळं करतो यापेक्षा? '२६ जुलै' हा दिवस आपण 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा करतो. पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देऊन आपण आपला भूभाग परत मिळवला. आपल्या जवानांनी सर्वांत उंचावरची ही लढाई मोठ्या शौर्‍यानं लढली. या सगळ्या काळामध्ये देशभरामध्ये अगदी 'राष्ट्रप्रेम' भरभरून दिसत होतं. थोडे दिवस हे टिकलं आणि नंतर २६ जुलै या एका दिवसापुरतं आपण त्यांना सीमीत केलं. यंदा तर हा त्यांच्या हक्काचा एक दिवसही आपण दिला नाही. आज काही कार्यक्रम जरून झाले या दिनानिमित्त. याच्या बातम्याही उद्या छापून येतील, पण त्यांचं अस्तित्त्व हे तीन किंवा चार कॉलमापलिकडे नसेल. अमूक मंत्री हे म्हणाला आणि ते म्हणाला, हे उपस्थित होते, अध्यक्षस्थानी ते होते. यापलिकडे जाऊन काय उरणार महत्त्व या बातमीला? आपण 'कारगिल विजय दिवसा'सारखी महत्त्वाची गोष्ट विसरू कशी शकतो? कुठल्याही वृत्तपत्रानं काहीच कसं छापलं नाही याबद्दल? राजकारण्यांच्या बातम्या, खून, दरोडे, बलात्काराच्या बातम्यांनी आपणही दगडासारखं वागायला लागलो आहोत का? इथे आपण याचा अर्थ 'माध्यमं' असा अपेक्षित आहे. कारगिल विजय दिवस महत्त्वाचा वाटतच नसेल, तर अर्थ काय सगळ्याचा? कशाला आपण म्हणवून घेतो 'समाजाचे रखवालदार' वगैरे? आपली रक्षा करणार्‍यांविषयीच जर आपण इतकं कोरडे राहत असू, तर माध्यमांना आत्मपरिक्षण करण्यासाठी अजून एक कारण मिळालं आहे, असंच समजावं लागेल.

1 comment:

  1. Hiiiiiiiieeeeeeeee Gdya, nehemi aapli ya babtit charchya hot rahate. Madhyamanni kay karayala hawe yababtace sandarbha fakt wegale astat. Madhamymanchi nitimulye shikalyanantar jyaweli aapan pratyaksyat kaam kartoy tyaweli aapalyala yenara anubhaw kiti wegala yetoy he samajtay aata. Bar etarnnch jaude pan aapan kay karu shakto yaach wichar nakkich karta yeil. N I really appreciate your feelings. Mala swatahalasuddhay aapalyaa sawatahacyaa fieldmadhil ya wastusthitichi laaj watate, pan mi swatahatari he nakkich tharawal aahe ki je praytn mazyakadun hotil te karayace. Nidan swatahalatari samadhan. Madhyamwyawsta badalun takaychi suruwat swatahapasunc. And I think tulasuddha he patel. Lets hope for better work on field wid satisfaction.
    Really a gud post my dear frnd. Keep it up n keep thinking so that you can think for better work.

    ReplyDelete